संध्याकाळी गच्चीत फेरी मारली कि नेहमी एक "Scene" बघायला मिळतो !
आजुबजुच्या वेगवेगळ्या झाडांवर ४.३०/५ पासून ५०-६० rose-ring parakeets येतात. तास दीड खातात, खेळतात, preening चालू असते. सूर्यास्त जवळ आला की एक-एक थवा उडून जायला लागतो.
सगळे नाही जात. मग सूर्यास्त झाला की घारी येतात एकदम घोळक्यात, त्याच्या बरोबर कावळे आणि वटवाघुळे पण येतात. एकदम नियमित.
ते आले की उरले सुरलेले सगळे rose-ring parakeetsचे थवे उडून जातात. पुढच्या १५ मिनटात सगळे गायब.
हेच "Routine" रोज, ना चुकता.
हा खेळ बघून मला लहान पण आठवते, रोज संध्यकाळी घरा समोरच्या ग्राउंड वर आम्ही सगळी मुलं असेच ४.३०/५ वाजता नियमित, ना चुकता खेळायला जायचो. सूर्यास्त जवळ आला की एक-एक जण घरी जायचा.
सगळे नाही जात. मग सूर्यास्त झाला की कोणाची आई, कोणाचे बाबा ..कोणीतरी वडीलधारी मंडळी ग्राउंड वर राऊंड मारायचे.
मग उरले सुरलेले सगळे जण गप गुमान घरी जायचे. पुढच्या १५ मिनटात सगळे गायब.
हेच "Routine" रोज, ना चुकता.
हात जोडून विनंती: फक्त "Scene"शी relate करा. "Characters"शी नाही.