ऑफिसचे काही दिवस खूपच "mentally tiring" असतात. वर्क फ्रॉम होमचे सुख म्हणजे, terraceची एक quick birding टूर करता येते.
आज असाच "mentally tiring" दिवस होता, म्हणून गच्चीत गेले, of course कॅमेरा घेऊनच.
ऊन अजून उतरले नव्हते, "rose-ringed", कावळे आणि कबुतर सोडता काही दिसत नव्हते.
"sunbird" शोधाताना माझी नजर आंब्याच्या झाडाला आलेल्या मोहरा कडे गेली, मोहोर बघून दिल खुश हो गया. चला उन्हाळा छान जाणार हयाची खात्री पटली! असो!
तेवढ्यात एक छोटासा सुरेख भुंगा मोहोरा वर येऊन बसलेला दिसला, मस्त ताव मारत होता. तो कॅमेऱ्यात टिपला.
तो जातोय तर अजून दोन-तीन सुंदर माश्या/भुंगे दिसले मग काय, ते पण कॅमेरॅत टिपले. एक पाऊल पण ना उचलता केवढा खजिना मिळाला, परत एकदा दिल खुश हो गया!
१५ मिनिटंचा ब्रेक पण काय धम्माल आली, असे वाटले इथेच मीटिंग बोलावू आणि ह्यांनाच (re)view करू!
पण लगेच स्वतः साठी "right expectations" सेट केल्या आणि गप-गुमान कॉफी घेऊन लॅपटॉप समोर बसले, "fully recharged"!
Eristalinus (hoverfly / dronefly )
Red Dwarf Honey Bee
Common Flesh Fly
Blue-green Bottle Fly