9 मैत्रिणी, overnight night trip plan करायला लागतात. 9 च्या 6 होतात...आणि 6 च्या 4. मग चारच जणी जायचे का, हो नाही हो नाही ....वगैरे वगैरे.
मग चार तर चारच जाऊच या!
Purple sunbird
एक driver जी रस्ता कमी पक्षी जास्त बघते , एक उत्तम टूर organiser पण नावाची navigator, एक DJ आणि एक गप्पा Incharge.
एक तासाचा प्रवास निवांत दोन तासात पूर्ण करत destination गाठतो.
Honey Bee
हिरवा गार परिसर, पावसाळी हवा, डोंगर आणि मधूनच येणारा बरिक पाऊस, आयते मस्त गरम जेवण त्या बरोबर अनंत गप्पा. गप्पांची range काहीच्या काही!
Common Leopard
काय ती हिरवळ, तो रस्ता, नदी, bridge.. ते बदलणाऱ्या चांगल्या वाईट infrastructure पर्यंत.
Common Shot Silverline
मुलं, नवरे, सासू, नातेवाईक, ऑफिस आणि अर्थात न आलेल्या मैत्रिणी पर्यंत.
Common Gull
बदलणाऱ्या value systems ते adapting to the future way of living पर्यंत.
A beautiful moth
Important shopping पासून वायफळ खर्च ते saving आणि मग economy पर्यंत.
Genus Neopanorpa
Diet plan, fitness, medical tests...ते डिनर करताना अजून एक खीर खाऊच या पर्यंत.
Common Grass Yellow
Cancelled travel प्लान चे frustration, खूप सारे travel plans असल्याने confusion, एका घुबडाचा फोटो काढण्यासाठी केलेली adventure trip ते न चुकता dream trip च्या planning पर्यंत.
Common Grass-Dart
Westside च्या sale, online fashion tips पासून latest trends..नाही नाही actually येवलाच्या पैठणी पासून party dress... सगळच.
Great Eggfly
रात्री किर्र अंधारात काजवे बघून शांत झालो, ते एका पाली वर नजर पडे पर्यंत.
Striped Hawkmoth
फालतू gossip ते deep philosophy पर्यंत..I can go on and on, but that needs to be on another trip.
Hummingbird Hawkmoth
प्रत्येकीचे perspective वेगळे, प्रत्येक जण आपलं मत मांडते बिनधास्त. No competition, no jealous just good vibes. Listening to each other आणि sharing.
Common Five-Ring
गाडी सुरू झाली आणि त्या बरोबर गप्पा, त्या गप्पा दुसऱ्या दिवशी गाडी घरी येऊन बंद केली तो पर्यंत सुरूच राहिल्या. मला खात्री आहे त्या अजून चालूच आहेत, मनातल्या मनात.
Plain Tiger Butterfly
Women are good at multitasking, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे गप्पा मारता मारता काढलेले फोटो.
Pea Blue